भगूर नगरपरिषदेच्या निकालानंतर लगेच कामांची सुरवात केली शहरातील स्मशानभूमी, बौद्धविहार यासह विविध नागरी समस्यांबाबत प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली. देवळालीच्या आमदार सरोजताई आहिरे यांच्या कडून कामांसाठी निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी चर्चा केली.
या वेळी नागरिकांच्या अडचणी, गरजा व अपेक्षा समजून घेत सखोल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी आमदार सौ सरोजताई आहिरे, भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे, नगरसेवक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या सहभागातूनच विकासाला दिशा मिळते—या समस्यांचे योग्य व वेळेत निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.