जिल्हावासियांसाठी रेमडेसिव्हिरचा पुरेसासाठा उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार हेमंत आपा गोडसे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांच्याकडे आग्रही मागणी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/04/2021 8:48 PM

जिल्हावासियांसाठी रेमडेसिव्हिरचा
पुरेसासाठा उपलब्ध करुन देण्याची मागणी
खासदार हेमंत आपा गोडसे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांच्याकडे आग्रही मागणी

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिकसाठी सात हजाराहून अधिक रेमडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अजूनही इंजेक्शन उपलब्ध व्हावीत, यासाठी आज शुक्रवारी खासदार गोडसे यांनी मुंबईत जावून अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची विशेष भेट घेतली. याभेटीत जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक असून याबरोबरच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात नाशिकसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन द्यावा, ऑक्सिजन साठ्यासाठी जेम्बो टॅकची सोय करुन देण्याची  गळ घातली. दरम्यान अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक शहर व जिल्हाभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना बाधितांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत साठा अपूर्ण पडत असल्यामुळे गेल्या आठवड्यात खा. गोडसे यांनी मायलन कंपनीशी चर्चा करुन नाशिकसाठी सात हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन घेतला आहे. यातील पहिल्या टप्पा संबंधित अधिकृत विक्रेत्यांना इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अजूनही रेमडिसिव्हिरची इंजेक्शनची आवश्यकता असल्याने आज शुक्रवारी खा. गोडसे यांनी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची भेट घेवून रेमडिसिव्हिरचा पुरवठ्याबाबत चर्चा केली. दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या या समस्याबाबत पालकमंत्री ना. छगन भुजबळ देखील आपल्या संपर्कात असल्याची माहिती आयुक्त काळे यांनी खा. गोडसे यांना दिली.

नाशिक जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग भारतात पहिल्या पाच शहरांइतका असल्याने नाशिकसाठी रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा अजूनही अतिरिक्त साठा नाशिकला पुरविण्यात यावा, तसेच नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे तात्काळ भरावीत, ऑक्सीजन साठा साठवणुकीसाठी जेम्बो टॅकची सुविधा करुन ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी खा. गोडसे यांनी आयुक्त काळे यांच्याकडे केली आहे. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असून लवकरच नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी अतिरिक्त रेमडिसिव्हिरचा पुरवठा करण्याबाबत आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिकसाठी अजून अतिरिक्त रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा पुरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

००००००००००००००

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. रेमडिसिव्हिर इंजेक्शन बऱ्याचप्रमाणात कोरोना बाधितांवर उपायकारक ठरत आहे. त्यामुळे रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठ्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या व्वयवस्थापिक संचालक अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. त्यांनी इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत सकारात्मता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच नाशिकसाठी रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा अतिरिक्त साठा उपलब्ध होईल.  खासदार हेमंत गोडसे, नाशिक
याशिवाय रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरेसा साठा मिळावा यासाठी इंजेक्शनच्या तीन कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात खा. गोडसे यांनी संर्पक साधत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये सिपला कंपनीचे अफसर शेख, सन फार्माचे अच्यूत रेडकर, झायडस कंपनीचे विजय भालेराव यांच्याशी चर्चा करुन नाशिकसाठी अतिरिक्त साठा रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन देण्याची खासदार गोडसे यांनी मागणी केली.

Share

Other News

ताज्या बातम्या