धानोरा तालुक्या साठी मर्यादित आदेश लागू - तहसीलदार धानोरा

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 15/04/2021 5:38 PM

धानोरा :- 

१. दिवसभर जीवनावश्यक दुकाने चालू न ठेवता दररोजता सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालू ठेवणे.

२. अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त संपूर्ण संचार बंदी.

३. लग्न... प्रोटोकॉल पाळा.
शासन आदेशा प्रमाणे दिनांक १५ पासून केवळ २५ व्यक्ती लग्न समारंभ मध्ये राहतील.. 
जमत नसेल तर लग्न समारंभ पुढे ढकलावा...

४. पुढील १५ दिवस कडक निर्बंध पाळणे... 
११ ते ३ फक्त आणि फक्त जीवनावश्यक वस्तू साठी बाहेर पडावे...उदा. किराणा महिन्या भराचा  एकदाच घेऊन ठेवावा.. भाजीपाला ४ ते ५ दिवस पुरेल एवढा एकदाच घेऊन ठेवावा.. 
मुला बाळांना एक एक वस्तू आणायला बाहेर पाठवू नये.

५. बाकी कामे देखील या वेळेतच पूर्ण करणे... जसे शेती विषयक मटेरियल खरेदी वगैरे.

६.फक्त आरोग्य विषयक म्हणजे हॉस्पिटल्स medicals pharma इत्यादी २४ तास चालू राहतील...

७.हॉटेल  पॅकिंग पार्सल सेवा (११ ते ३) चालू ठेवावी...इतर वेळी किचन चालू ठेवून घरपोच सेवा द्यावी... हॉटेल मध्ये बसून खाताना कोणी व्यक्ती आढळून आल्यास ते हॉटेल सील करण्यात येईल तसेच दंडात्मक व अन्य कार्यवाही करण्यात येईल... 

८. बँक ११ ते ३ चालू राहील.
३ वाजे नंतर कार्यालयीन कामे चालू राहतील.

९. किराणा medicals इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी दुकानाचा जेवढा भाग खुला ठेवला असेल तेथे प्लास्टिक कव्हर लगेच लावून घ्यावा..(सर्वासाठी बंधनकारक).. 

१०. रस्त्या वरील उघडे पदार्थ तेथेच उभे राहून खाताना दिसल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल... 

१२. ११ ते ३ या वेळेत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून प्रशासन देखील फिरते पथक ठेवणार आहेत... कोणाचीही हयगय केली जाणार नाही

१३. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती तसेच सहकार्याची अपेक्षा ... 







शरीक शेख (धानोरा तालुका प्रतिनिधी)
8275416151

Share

Other News

ताज्या बातम्या