शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 19/01/2021 7:37 AM


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार

सुधारीत नियमावली सुचना ,अभिप्राय मागविणेबाबत



ठाणे   : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतिवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू,साहसी ,दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबत नियमावली शासन निर्णय दि. 24 जानेवारी २०२० नुसार निर्गमित केलेले आहे. या नियमावलीत सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय दि. २२ जानेवारी २०२१ पर्यंत मागविण्याचे शासनास निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सूचना, अभिप्राय [email protected] किंवा [email protected] या मेलवर दि.२२ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे , विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय , शिवछत्रपती क्रीडा संकुल , म्हाळुंगे , बालेवाडी ,पुणे यांच्याशी संपर्क साधावा असे  जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या