मुतखडा किडनी/ब्लॅडर स्टोन

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 01/11/2020 12:36 AM

मुतखडा किडनी/ब्लॅडर स्टोन


गाल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्तखड्याची पोस्ट टाकल्यावर अनेकांनी मुतखडा किडनी/ब्लॅडर स्टोन याच्या बद्दलही विचारणा केली म्हणून हा लेख 

पानफुटी, दगडीका पाला, किंवा पथरिका पत्ता म्हणून ओळखले जाणारे हे झाड. याची पाने कुंडीत ठेवून वर थोडी माती भुरभूरली आणि थोडे पाणी शिंपडले की या पानाच्या बेचक्यातून मुळे फुटून झाड उगवते. म्हणून त्याला पानफुटी म्हणतात. 

बर्याच जणांकडे हे झाड असते. घरातील कुंडीत किंवा अंगणातही लावून ठेवावे असे झाड. पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूचाही फोटो टाकलेला आहे. तीन दिवस, फक्त तीन दिवस सकाळी याचे एक पान आणि एक काळी मिरी चावून खायची. ९९ टक्के लोकांचा खडा कधी विरघळून पडून जातो ते कळतही नाही.
परत कधी त्रास झाला तर परत हाच उद्योग करायचा. एखाद्याला त्रास चालूच राहिला तर मग आयुष डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यायचे. शस्त्र क्रिया करून काढून टाकला तर आयुष औषधे नीट काम करू शकत नाहीत.

याचे कारण असे की मुत्र हेल्दी असले तर खडा होत नाही. आयुष औषधे मुत्र हेल्दी करतात. मग तो खडा विरघळू लागतो. त्यासाठी त्रास असावा लागतो. जसजसे मुत्र हेल्दी होते तसतसे लक्षणांवरून डॉक्टरना अंदाज येत राहतो. पण शस्त्र क्रिया करून काढून टाकला, तरी मुत्र हेल्दी झालेले नसल्याने परत परत होऊ शकतो. यासाठी शस्त्र क्रिया टाळावी. एव्हढेच. 

धनंजय केशव केळकर.

Share

Other News

ताज्या बातम्या