ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*माजी नगरसेविका वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांच्या पुण्यस्मरणार्थ मास्क वअर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप*


  • Yunus Shaikh (Kasrali )
  • Upadted: 10/17/2020 5:41:53 PM

नांदेड प्रतिनि
शेख युनुस 

बिलोली येथिल नगर पालिकेच्या  दिवंगत माजी नगरसेविका वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधुन शुक्रवार दि 16 आॕक्टोंबर रोजी येथिल तहसिल कार्यालयासमोर नागरिकांना मास्क व असैर्निक अल्बम गोळ्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीदिनानिम्मीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त ठरणाऱ्या मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आल्याने हा  स्मृतीदिन लोकोपयोगी ठरला आहे.

येथील नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वत्सलाबाई भिमराव गायकवाड यांचे गतवर्षी दि. 16 आॕक्टोबर रोजी निधन झाले होते . त्याच्या स्मृती प्रित्यर्थ दिवंगत गायकवाड यांचे चिरंजीव पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी शुक्रवारी बिलोली येथील तहसिलसमोर नायब तहसिलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. नागेश लखमावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर, माजी नगराध्यक्ष भिमराव जेट्ठे, सेवानिवृत्त तलाठी माधवराव जाधव, पोलीस निरीक्षक  प्रफुल्ल अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे,राजेंद्र कांबळे, अभिजित तुडमे,दिलीप उत्तरवाड, गंगाधर पुपलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
दिवंगत गायकवाड यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातील केलेल्या लोकोपयोगी कामाच्या आठवणींना या निमित्त उपस्थितांकडुन उजाळा मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, नगरसेवक जावेद कुरेशी, अमजद चाउस, आरोग्य पर्यवेक्षक हणमंत कटके, सुधीर येलमे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Share

Other News