स्वारातीम विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी घेतली ऊर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/12/2025 3:37 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि.१४ ते २० डिसेंबर, २०२५ या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून आज दि.१७ डिसेंबर, २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी उपस्थित प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना ऊर्जा बचत व पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा दिली. ऊर्जेचा विवेकी वापर, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अधोरेखित केले.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, नवोपक्रम व नवसंशोधन सहाचार्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर तसेच विद्युत उपअभियंता अरुण धाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजाराम माने, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड,  शिवलिंग पाटील, धर्मपुरी कोंका, राजसाहेब बोराळे, संतोष चव्हाण, शिवाजी चांदणे, बंडू कांबळे यांच्यासह विद्युत विभागातील संजय जाधव, संतोष पद्मे, जितेंद्रसिंग शिलेदार, महेंद्र सरकटे, बाबुराव हंबर्डे, उद्धव सातपुते, राजानंद कजबे, शिवम लुटे, पांडुरंग गोवंदे आदींसह विद्यापीठातील शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऊर्जा संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या