प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विनावापर साहित्य खरेदीसाठी १९ डिसेंबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 18/12/2025 2:34 PM


अहिल्यानगर, दि. १८: प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथील कालबाह्य झालेले वेस्ट पेपर, नादुरुस्त संगणक, हार्डवेअर व वापरायोग्य नसलेल्या कार्यालयीन फर्निचरची विक्री करावयाची आहे. यासाठी इच्छुकांनी त्यांचे दरपत्रक सीलबंद पाकिटामध्ये १९ डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चांदणी चौक, सोलापूर रोड, अहिल्यानगर येथे सादर करावेत.

विहित कालावधीनंतर प्राप्त दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. दरपत्रक मान्य अथवा रद्द करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयास राहतील. याबाबतच्या अटी व शर्ती कार्यालयीन नोटीस बोर्डवर उपलब्ध असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी कळविले आहे.

*******

#Ahilyanagar #RTO #Auction #ScrapSale #Ewaste #PublicNotice #Maharashtra #RTOSale #TenderNotice #अहिल्यानगर #प्रादेशिकपरिवहनकार्यालय #लिलाव

Share

Other News

ताज्या बातम्या