नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेला आजपासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनही आज करण्यात येणार आहे.
आज दुपारी 2 वाजता देवस्वारी व पालखी पूजन संपन्न होणार असून, यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार राजेश पवार व कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
*उद्या अश्व-श्वान-कुक्कुट प्रदर्शन व महिला-बालकांसाठी स्पर्धा*
माळेगाव यात्रेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सकाळी 10 वाजता अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, खासदार डॉ. अजित गोपछडे व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख उपस्थितीत आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त राजकुमार पडिले उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता माळेगाव यात्रेत महिला व बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, आमदार श्रीजया चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर हेही उपस्थित राहणार आहेत. श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक व कृषी-पशुसंवर्धन उपक्रमांमुळे माळेगाव यात्रेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.