बैल पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांचे संचलन

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 10/09/2026 2:53 AM

जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.

जामखेड पोलीस ठाण्यापासून सुरुवात; बीड कॉर्नर, मेन पेठ, खर्डा चौक मार्गे नूरानी कॉलनीपर्यंत रूट मार्च

जामखेड, दि. 9 सप्टेंबर 2026 : आगामी बैल पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामखेड पोलिसांकडून बुधवारी रूट मार्च व जमाव विसर्जनाचा सराव घेण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार हे संचलन करण्यात आले.

पोलिसांच्या रूट मार्चला दुपारी 12.25 वाजता जामखेड पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. पोलीस पथकाने जामखेड पोलीस ठाणे येथून बीड कॉर्नर → मेन पेठ → खर्डा चौक → तपनेश्वर रोड → नूरानी कॉलनी → सदाफुली वस्ती असा नियोजित मार्गक्रमण करीत संचलन केले.

या संचलनादरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व संवेदनशील भागातून मार्गक्रमण करून आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश दिला.

रूट मार्चमध्ये जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, एपीआय अजित मोरे, पीएसआय किशोर गावडे, पीएसआय गणेश आघाव, पीएसआय खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आणि अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील अधिकारी, डीआय व होमगार्ड यांचा सहभाग होता.

संचलनाची सांगता झाल्यानंतर जामखेड बसस्थानक परिसरात जमाव विसर्जनाचा सराव घेण्यात आला. डीआय अन्वर सय्यद यांच्या उपस्थितीत हा सराव पार पडला. सरावादरम्यान आवश्यक पोलीस साहित्याचा वापर करण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून जामखेड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी येरप्पा काळे, नगरपरिषदेची अग्निशमन गाडी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व रुग्णवाहिका यांचीही उपस्थिती होती.

रूट मार्च व जमाव विसर्जनाचा सराव दुपारी 1.35 वाजता शांततेत पूर्ण झाला. आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या