जामखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; सोयाबीन-उडीद पिकांचे मोठे नुकसान

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 05/09/2026 8:03 AM


जामखेड : प्रतिनिधी जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे


जामखेड तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग यांसह विविध पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागांत पिकांची अवस्था अत्यंत खराब झाली असून काही ठिकाणी सोयाबीन व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
पिकांना ऐन वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण करावे, पात्र शेतकऱ्यांना पीकविमा व शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी, तसेच रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, मूग, उडीद आणि मका या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.


Tags: #जामखेड #दुष्काळ #सोयाबीन #उडीद #शेतकरी #पिकनुकसान

Share

Other News

ताज्या बातम्या