नांदेड :- दैनिक ‘एकमत’च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त नांदेड येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार कवानकर यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सातत्याने कार्य करणाऱ्या गजानन अनंतवार कवानकर यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेत दैनिक ‘एकमत’च्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दैनिक ‘एकमत’चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंगजकर साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उपस्थित होते.
यावेळी ACP पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब, जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर साहेब, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. डोईफोडे साहेब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख साहेब, शिवालय महिला उद्योग नांदेडच्या अध्यक्षा सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर, दैनिक ‘एकमत’चे आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी सर तसेच तालुका प्रतिनिधी गौतम वाठोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, पोलीस, उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार कवानकर यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा असून, त्यांच्या कार्यामुळे समाजसेवेला नवी प्रेरणा मिळत असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
कलाल, गौड समाजाच्या वतीने शुभेच्छा
या कार्यक्रमास राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार यांच्यासह अशोक पडलवार, गंगाधर नंदेवाड, दत्तात्रय अनंतवार आदी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समिती व कलाल समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार कवानकर यांचे अभिनंदन करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
गजानन अनंतवार कवानकर यांचा झालेला हा सन्मान हा त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव असून, कलाल, गौड समाजासाठीही अभिमानाचा क्षण असल्याची भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.