*भगूर , ति.झं. विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण*
*नाशिक एज्युकेशन सोसायटी* संचलित
*ति.झं.विद्यामंदिर शाळेत कै तेजस शिंदे याचे स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व खाऊ वितरित करण्यात आला मुख्याध्यापिका मनीषा देशपांडे
यांनी उपस्थितां चे स्वागत केले. याप्रसंगी देणगीदार जयेश शिंदे ,विजय गव्हाणे यांनी तेजस शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला, आणि *कै. तेजस शिंदे याचे स्मरणार्थ 35 शालेय दप्तर व खाऊ वितरित करण्यात आले*
याप्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका वंदना आडके, निखिल गवळी, विराज गोडसे ,आशिष काजळे, शुभम बोराडे, वैभव तुपे, मनसेचे कार्यकर्ते, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व निवेदन हेमंत काशीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजया चतुर यांनी केला
उपस्थितांचे आभार वंदना आडके यांनी मानले.