नांदेड :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे DMA ग्रुप,च्या वतीने वॉर्ड क्रमांक ६ च्या बाहेर १० पंखे बसविण्यात आले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णालयात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापूर्वी पहिल्या वर्षी ३ व्हीलचेअर, दुसऱ्या वर्षी प्रत्येक वॉर्डमध्ये नेब्युलायझर, तर तिसऱ्या वर्षी १० व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याच सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी वॉर्ड क्रमांक ६ समोर १० पंखे बसविण्यात आले आहेत. रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
बुधवार,१९ ऑगस्ट २०२६ रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता मा. श्री. डॉ. सुधीर देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अधिष्ठाता माननीय डॉ.सुधीर देशमुख साहेब यांच्या सह उपस्थीत प्रमूख डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेंचे कार्य गोरगरीब जनतेची सेवा—हीच खरी ईश्वर सेवा आहे’ या सेवाभावी विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी यावेळी अधीक्षक डॉ.शिवानंद, उपअधीक्षक डॉ.अजय वराडे ,साखरे, सखाराम लुटे, बालाजी सावंगीकर, भीमराव परोडवाड, सुहास हाके,शिंदे सिस्टर लक्ष्मीकांत कळसकर ,गोविंद मुंडकर ऊर्मिला शेळके सिस्टर ,जयवंत सूर्यवंशी, ईश्वर गोरे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.यावेळी सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांनी मानले.समाजातील गरजू घटकांसाठी सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.