शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी आवश्यक सुधारणा कराव्यात

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/08/2026 8:06 PM

नांदेड :  शासन अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम 2026  प्रसिद्ध झाली आहे. या अधिसूचनेतील नियम 6A व्यतिरिक्त इतर सर्व बाबी शालेय बस व शालेय व्हॅनशी संबंधित आहेत. 

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी या सुधारित नियमांनुसार आपल्या शालेय बस, शालेय व्हॅन तसेच संबंधित व्यवस्थापनामध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. या सुधारणा 16 जुलै 2026 पासून तीन महिन्यांच्या आत पूर्ण कराव्यात, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित शालेय बस व शालेय व्हॅन धारकांनी महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम 2026 चे पालन करून निर्धारित मुदतीत आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात.

Share

Other News

ताज्या बातम्या