*भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांस भगूर मध्ये भाजप कडून अभिवादन*..
भारतीय जनता पार्टी, भगूर यांच्या वतीने दि. 16 ऑगस्ट 26 रोजी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनी भगूर भारतीय जनता पार्टी च्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भगूर शहरातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी करंजकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील विविध क्षेत्रातील कार्याचा परिचय करतांना महाकवी, आदर्श राजकीय नेता, कुशल संघटक,अजातशत्रू व्यक्तिमत्वचा अनेक उदाहरणावरून त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, जेष्ठ भाजपा नेते मधुकर कापसे, अनंत कापसे, नारायण कुलकर्णी, नगरसेवक प्रा. मृत्युंजय कापसे, नगरसेविका सुजाता शिरसाठ, शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे, जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी दादासाहेब देशमुख,निलेश हासे, रंजन कापसे, पत्रकार भरत चव्हाण, निलेश हेंबाडे, रवींद्र लकारिया आदी भगूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने अभिवादन केले.