बार्न्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवळाली , येथे भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी एअर कमांडर शुभ्रदिप निगम , VSM यांच्या हस्ते ध्वजारोहण

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/08/2026 10:08 PM

बार्न्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  देवळाली ,नासिक येथे भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी माननीय एअर कमांडर शुभ्रदिप निगम , VSM यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
यावेळी शाळेच्या परिसरात देशभक्तीच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी , शिक्षकवृंद आणि पालकांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविधगुणदर्शनातून देशभक्तीपर गीत सादर केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय एअर कमांडर शुभ्रदिप निगम, VSM त्यांच्या पत्नी श्रीमती लतिका निगम यांच्यासह प्राचार्या उत्तरा कुलकर्णी आणि इतर मान्यवरांवउपस्थितीत होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी त्यांनीआपल्याभाषणात
विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवलेली उत्कटता आणि जिद्द त्यांच्या देशभक्तीची भावना स्पष्टपणे दर्शवते. आपल्या देशाचे भवितव्य अशा उत्साही आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या सुरक्षित हातात आहे, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आणि समृद्ध असेल.अशी खात्री व्यक्त केली.

Share

Other News

ताज्या बातम्या