नमो शेतकरी ९वा हप्ता: GR, वितरण तारीख आणि विलंबाचे कारण स्पष्ट करण्याची मागणी

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 18/08/2026 3:48 AM


अहिल्यानगर | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असून, या हप्त्याच्या वितरणाबाबत शासनाने तातडीने स्पष्ट तारीख जाहीर करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व हिंदी-मराठी पत्रकार संघाचे तालुका संघटक रवि शिंदे यांनी केली आहे.

यासंदर्भात शिंदे यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच संबंधित शासनस्तरीय अधिकाऱ्यांकडे निवेदन ई-मेलद्वारे सादर केले आहे. राज्यातील लाखो पात्र शेतकरी ९व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरीप हंगामासाठी पेरणी, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर शेतीविषयक खर्च मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ हप्ता लवकरच वितरित केला जाईल, असे सर्वसाधारण आश्वासन न देता त्याबाबत अधिकृत निर्णय व निश्चित कालमर्यादा जाहीर करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

शासनाकडे पाच महत्त्वाचे प्रश्न

शिंदे यांनी शासनाकडे पुढील प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मागितली आहेत—

  1. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या हप्त्याच्या वितरणासाठी शासन निर्णय (GR) कधी काढण्यात येणार आहे?

  2. सदर शासन निर्णय काढण्याची अपेक्षित तारीख किंवा निश्चित कालमर्यादा काय आहे?

  3. शासन निर्णय काढल्यानंतर ९वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नेमका कधी जमा करण्यात येणार आहे?

  4. ९व्या हप्त्याच्या निधी वितरणाबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा कधी करण्यात येणार आहे?

  5. शासन निर्णय काढण्यास अथवा निधी वितरणास विलंब होत असल्यास त्यामागील अधिकृत कारण काय आहे?

शेतकऱ्यांना अधिकृत माहिती देण्याची मागणी

सध्या शेतकऱ्यांमध्ये ९व्या हप्त्याच्या वितरणाच्या तारखेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शासनाने अफवा आणि अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करून पात्र शेतकऱ्यांना अधिकृत व स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रवि शिंदे यांनी केली आहे.

पात्र शेतकरी ९व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे शासन निर्णय कधी निघणार आणि त्यानंतर हप्ता नेमका कधी खात्यावर जमा होणार, याबाबत शासनाने स्पष्ट तारीख किंवा निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. केवळ निवेदन एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवण्याऐवजी या विषयावर शासनस्तरावर ठोस निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांना अधिकृत माहिती देण्यात यावी,” अशी मागणी शिंदे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ९व्या हप्त्याच्या वितरणाबाबत शासनाने विलंब न करता कार्यवाही करावी आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

– रवि शिंदे
माहिती अधिकार कार्यकर्ते
हिंदी-मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
अहिल्यानगर, महाराष्ट्र

#NamoShetkari #NamoShetkariMahaSanmanNidhi #9वा_हप्ता #शेतकरी #अहिल्यानगर

Share

Other News

ताज्या बातम्या