स्वरा सचिन दडड्नावरचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/08/2026 10:38 AM

कुपवाड  : प्रतिनिधी

डीकेटीईच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, नारायण मळा, इचलकरंजी येथील स्वरा सचिन दड्डनावर हिने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

स्वराने २४४ गुण मिळवत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत २२८ वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व पालकांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराच्या या यशामागे तिची मेहनत, सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या