स्मार्ट मीटर विरोधी कृती समिती स्थापन, अध्यक्षपदी चंदनदादा चव्हाण तर उपाध्यक्षपदी नितिन मिरजकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/08/2026 10:35 AM

केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात सांगली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनासाठी ‘स्मार्ट मीटरविरोधी कृती समिती, सांगली जिल्हा’ स्थापन करण्यात आली असून, गुंठेवारी चळवळीचे जनक तथा जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

आज सांगली येथील सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कृती समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी चंदनदादा चव्हाण, उपाध्यक्षपदी समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, तर सचिवपदी महेश मासाळ यांची निवड करण्यात आली.

या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मार्ट मीटर योजनेच्या माध्यमातून अदानी, जीनस इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या मोठ्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होणारा संभाव्य आर्थिक बोजा, वाढीव वीज बिलांबाबत नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी तसेच स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेतील विविध प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस रामदास सावंत, विजय बल्लारी, सतीश फोंडे, श्रीधर करडे, सलीम पन्हाळकर, युनूस महात, प्रणव पाटील, डॅनियल भोपळे, डॉ. मन्नान शेख, सीमा गायकवाड, सुभाष तोडकर, हुसेन शेख, दत्ता पाटील, नईम शेख, विनोद तांदळे, युवराज मोने, शिवाजी वाघमारे, प्रशांत भोरे, सरवर खान, अरुण रुपनर, गॅब्रिएल तिवडे, शहाजी भोसले, आशुतोष धोतरे, महादेव करांडे, रणजित चव्हाण, राहुल माने, ॲड. अजित सूर्यवंशी, आयुब पटेल, गोरख व्हनखंडे, जैलाब शेख, सोहेल इनामदार, नासिर शेख यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या