नांदणी सहकारी बँकेच्या कुपवाड शाखेचे उद्घाटन संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/07/2026 7:38 PM

*सेवा, विश्वास, यांच्या जोरावर नांदणी सहकारी बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद - स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी*




नांदणी सहकारी बँकेची 11 वी शाखा कुपवाडचा उद्घाटन सोहळा कुपवाड शहरात मोठ्या थाटामाटात नांदणी संस्थान मठाचे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे अमृत हस्ते संपन्न झाले. 


नांदणी सहकारी बँकेची ही अकरावी शाखा व सांगली जिल्ह्यातील चौथी शाखा म्हणून शुभारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुभाष चवगोंडा पाटील हे होते. ॲड.सरोज जितेन रायनाडे पाटील,सांगलीचे जलसंपदा विभागाचे अश्विन कुमार बाळासो कर्नाळे, सांगलीचे उपमहापौर श्री गजानन मगदूम, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी शाखेच्या उद्घाटनानंतर लॉकर चे उद्घाटन  उपमहापौर श्री.गजानन मगदूम यांचे हस्ते करण्यात आले. तसेच स्वागत व प्रास्ताविक बँकेचे विद्यमान चेअरमन श्री आप्पासाहेब लठ्ठे यांनी केले. व बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत लवकरच शाखा पेठ- वडगाव येथे बँकेची 12वी शाखा सुरू करीत असल्याचे सांगत बँक लवकरच 500 कोटी ठेवीचा टप्पा पार करेल असे सांगितले. या कार्यक्रमास आलेले प्रमुख अतिथी यांचा सत्कार समारंभ संचालकांच्या वतीने करण्यात आला. महास्वामी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य  यांचे पादपूजन सौ.व श्री.वृषभ महावीर शेडबाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन खातेदार यांचा सन्मान प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी जागा मालक श्री. आदगोंडा गौंडाजे आणि उद्योजक श्री रावसाहेब लठ्ठे श्री जयकुमार पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील यांनी कुपवाड परिसरातील नागरिकांच्या उन्नतीसाठी आर्थिक स्थैर्यासाठी नांदणी सहकारी बँक अग्रेसर राहील याची खात्री दिली.

ॲड.सरोज पाटील व अरुण पवार यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली. 
यावेळी *परमपूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामी यांनी अभिवचन देत नांदणी सहकारी बँकेने 400 कोटी ठेवीचा टप्पा ओलांडत,सतत ऑडिट वर्ग अ तसेच 10% लाभांश व सभासद ग्राहकांना विश्वास सेवा देत जी प्रगती साधली आहे. ती कौतुकास्पद असल्याचे उद्गगार काढीत ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे, यावर सर्वांनी भर द्यावे असे सांगत शुभेच्छा पर आशीर्वाद दिला*

यावेळी आभार संचालिका सौ.त्रिशला सुरेश धुळासावंत यांनी मानले. सदर कार्यक्रमास सांगली- मिरज - कुपवाड महापालिकेचे सर्वश्री नगरसेवक ओंकार माळी, विष्णू माने ,सौ.मीनाक्षी पाटील, सौ.योगिता राठोड, दीपक वायदंडे,मोहन जाधव,अमोल पाटील, धनपाल खोत, तसेच जयकुमार पाटील, रावसाहेब लठ्ठे बँकेचे व्हा.चेअरमन श्री बाळकृष्ण देशपांडे,संचालक सर्वश्री रमेश भुजुगडे, राजेंद्र खूळ, संजय वसवाडे, संतोष पाटील, शितल देमापूरे, सूर्यकांत कुरडे, मनोहर माळी, चंद्रकांत कोरुचे,सचिन लठ्ठे, महेश परीट, बापूसो नदाफ, दत्तात्रय मोहिते,विद्यासागर बस्तवाडे, श्रीमती साधना कोळी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कसलकर, ए.जी.एम सुलतान अपराध,बोर्ड मॅनेजमेंट अध्यक्ष ज्ञानदेव बुबने,बाहुबली चौगुले, सदाशिव बुबने,बँकेचे सर्व अधिकारी शाखाधिकारी मनोज महींद, ऑफिसर कर्मचारी सर्व शाखाचे शाखा सल्लागार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसुली अधिकारी रुस्तुम मुजावर यांनी केले. यावेळी कुपवाड ग्रामस्थांनी कार्यक्रमास गर्दी केली होती.

Share

Other News

ताज्या बातम्या