नांदेड:-मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा पोलीस ठाणे, नांदेड येथे दाखल चोरीचा गुन्हा इतवारा गुन्हे शोध पथकाने अल्पावधीतच पाच आरोपीस चोरीतील मुद्देमालासह अटक करण्यात करण्यात यश मिळविले आहे.
फिर्यादी नामे शेख शहबाज शेख जाफर, वय 40 वर्ष, रा. नौमानिया कॉलनी, नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 24/07/206 रोजी सकाळी 09.00 वा. चे सुमारास त्यांचे किरायाचे घर मदिना नगर देगलूर नाका नांदेड येथुन नौमानिया कॉलनी, नांदेड येथे घरातील सामान स्थलांतरीत करत आरोपींनी संगणमत करुन त्यांचे वैद्यकीय व्यवसायातील व अपघात विम्यामध्ये मिळालेले एकूण अंदाजे ₹8,12,000/- किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 261/2026 कलम 306, 3(5) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार तसेच इतर तपासाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशईत आरोपी नामे 1) पिराजी बाळु वाघमारे, वय 51 वर्ष, 2) सुनिल बाबुरव रँपनवाड, वय 26 वर्ष, 3) सुनिल चिमनाजी वाघमारे, 24 वर्ष, 4) साहेबराव पिराजी वाघमारे, वय 28 वर्ष, 5) तनुष्क गणपत मेटकर, वय 19 वर्षे, याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम एकूण ₹8,12,000/-किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. सदर आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आले आहे.
सदरची उल्लेखनीय कार्यवाही ही मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि / रामेश्वर खनाळ, पोनि/संजय शिंदे, पोउपनि/आगलावे तसचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हरप्रितसिंघ सुखई, शेख इजराइल, रेवणनाथ कोरनुळे, साहेबराव जगताप, बंडु कलंदर, मारोती गिते, बशीर चौधरी सर्व नेमणुक पोलीस स्टेशन इतवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.