अर्धापूर :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील आठ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
यामध्ये कु. अनुष्का चंद्रकांत लासिनकर (२३६ गुण), कु.रिध्दी पाटील (210)कु.रिध्दी संगेवार (212)कु.मनस्वी बाह्राटे(180)चि.कार्तिक राठोड(196) कु. ईश्वरी भालचंद्र कल्याणकर (१६६ गुण), कु. आरुषी अवधूत देवडे (१५६ गुण) आणि कु. आरुषी जनार्धन साखरे (१४८ गुण) यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत मुख्याध्यापक अरुण कल्याणकर यांच्या हस्ते पुष्पहार व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी या यशावर न थांबता विविध स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले.
शाळेत नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय विशेष मार्गदर्शन, शंका निरसन सत्रे, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण तसेच पालकांशी सातत्यपूर्ण समन्वय या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत असल्याचे शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख आत्माराम कदम यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक गुलाबराव मदने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश कदम यांनी मानले.
यावेळी एस. एस. डोईबळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, प्रकाश कदम, एस. एम. दापकेकर, बी. जी. आवरे, आय. एस. शेख, वाय. जी. टिप्परसे, आर. जी. पाटील, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, आणि व्ही. के. कवाळे आदी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही अधिकाधिक विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.