खाजगी आरोग्य संस्था, क्लिनिक, प्रयोगशाळा, रक्तपेढ्या, फार्मसी आस्थापनांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशनमध्ये नोंदणी करावी;जिल्ह्यातील नागरिकांना आभा कार्ड काढण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/07/2026 6:59 PM

नांदेड  :- नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट आणि इतर अंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी आरोग्य संस्थांचे (रुग्णालये,क्लिनिक,डायग्नोस्टिक सेंटर,प्रयोगशाळा,मेडिकल स्टोअर,इमेजिंग सेंटर (एक्सरे/एमआरआय) यांची आयुष्यमान भारत डीजीटल मिशन अंतर्गत नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सधन आणि दुर्बल नागरिकांनी सर्व कुटुंब सदस्यांचे “ABHA” या मोबाईल अप्लिकेशनद्वारे किंवा नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन केवळ आधारकार्डच्या सहाय्याने आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत 'आभा' कार्ड काढण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे केले आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे रुग्णांच्या आणि रुग्णालयाची माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा सुरक्षित राहते किंवा शासनाद्वारे कोणत्याही खाजगी अस्थापना यावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने कोणत्याही प्रकारची संकोच किंवा भीती न बाळगता महानगरपालिका क्षेत्रातील, तालुका स्तरावरील आणि ग्रामीण भागातील सर्व खाजगी रुग्णालये, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर, इमेजिंग सेंटर (एक्सरे/एमआरआय) यांनी HFR (HEALTH FACILITY REGISTRY) व रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ यांचे एचपीआर (HEALTH PREOFESSIONAL REGISTRY) मध्ये नोंदणी आवश्य करावी. यासाठी आपल्याकडे नोंदणीसाठी येणाऱ्या शासकीय आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) ही भारत सरकारच्या नॅशनल हेल्थ ऑथोरिटी (NHA) द्वारे सुरू केलेली Unified Health Interface (UHI) प्रकारची एक महत्त्वाची योजना आहे. या मिशनचा मुख्य उद्देश देशातील नागरिकांसाठी एक अखंड डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा (Digital Health Infrastructure) तयार करणे हा आहे. याद्वारे रुग्णांचा वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणे, आरोग्य सेवा सुलभ करणे आणि रुग्ण, डॉक्टर व रुग्णालये यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडणे तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी 14 अंकी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) आयडी तयार करणे, वैद्यकीय नोंदी जतन करणे, जुने वैद्यकीय रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन आणि तपासणी अहवाल डिजिटल पद्धतीने साठवणे, रुग्णालये आणि डॉक्टरांमध्ये सुरक्षित व अधिकृतपणे आरोग्य डेटाची देवाणघेवाण सुलभ करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाच्या संमतीशिवाय कोणताही आरोग्य विषयक माहिती शेअर न करता माहितीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असून रुग्ण आणि रुग्णालयाच्या माहितीची गोपनीयता ठेवणे  देणे हा आहे. 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, भारत सरकार आणि आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्या आदेशानुसार आयुष्मान भारत डिजिटल मिशन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्याची “ABDM Model District” म्हणून  निवड करण्यात आलेली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे HFR (HEALTH FACILITY REGISTRY) व रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ यांचे HPR (HEALTH PREOFESSIONAL REGISTRY) मध्ये नोंदणी करण्यात आलेली असून दैनंदिनरित्या नागरिकांचे आभा कार्ड काढण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या