दिनांक: २८ जून २०२६
ठिकाण: प्रभाग क्रमांक १५, नुरानी मशीद परिसर, सांगली.
सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील नुरानी मशीद परिसरात नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यात आज जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब आहे.
अस्वच्छ आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि काविळीसारखे गंभीर आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
आमची मागणी:
तातडीने दखल घ्या: महापालिका प्रशासनाने त्वरित नमुना तपासणी करून पाणीपुरवठा शुद्ध करावा.
पाइपलाईनची तपासणी: दूषित पाणी नेमके कुठून येते, याचा शोध घेऊन सदोष पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करावी.
आरोग्याची सुरक्षा: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
सांगलीकर नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे, ही नम्र विनंती. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अन्यथा 'लोकहित मंच' तीव्र आंदोलन करेल.
— मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.