कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने काल सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांना चुकीच्या पद्धतीने नागरिकांच्या माथी मारलेल्या अन्यायी वाढीव घरपट्टी रद्द करणे बाबत निवेदन देण्यात आले.
सदर विषयावर मा.उपायुक्त यांनी सांगितले की नगरसेवक, व्यापारी,नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना,पत्रकार यांना बोलवून प्रेझेंटेशन दाखवले आहे, दैनिकांत पण प्रसिद्धीसाठी दिले आहे.नागरिकांनी यावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल कराव्यात.
पण प्रशासक काळातील घरपट्टी वाढीचा महासभेत ठराव झालेला नाही.नगरसेवक,व्यापारी,नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना,पत्रकार यांना बोलवून फक्त प्रेझेंटेशन दाखवले म्हणजे याचा अर्थ ते सर्वांना मान्य आहे असा होत नाही.सहमत असतील असे नाही.या दरवाढीला विरोध दर्शवून विद्यमान नगरसेवक येणाऱ्या महासभेत विषय आणतील,विरोध करतील अशी कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी आपली भावना व्यक्त केली.
जनभावना लक्षात घेता मा.उपायुक्त यांनी सोमवार दि २९/६ /२०२६ पर्यंत यावर तोडगा काढावा अन्यथा मंगळवार दि. ३० जून रोजी प्रभाग समिती कार्यालय क्र .3 कुपवाड येथे मनपा प्रशासना विरोधात लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे ,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की ,माजी उपमहापौर मोहनबापू जाधव,युवा नगरसेवक प्रकाश पाटील ,माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत , व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार,सागर खोत, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रविण कोकरे,सचिव विलास माळी ,खजिनदार प्रकाश व्हनकडे ,विठ्ठल संकपाळ,समीर मुजावर ,सुरेश साखळकर , महेश निर्मळे,अमोल कदम,श्रीकृष्ण कोकरे ,व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अमर दिडवळ,उपाध्यक्ष सचिन नरदेकर,पत्रकार नजिर बारगीर,समाधान धोतरे उपस्थित होते.