पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते वेलणकर बालकाश्रमात वह्या वाटप , लोकहित मंचचा स्तुत्य उपक्रम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2026 11:51 PM

 सांगली प्रतिनिधी 
              लोकहित मंचच्यावतीने सांगलीतील उद्योगरत्न वि.रा.वेलणकर बालकाश्रमामध्ये राहणाऱ्या मुलींना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये हातभार लावण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
          दरम्यान लोकहित मंच कडून चांगला उपक्रम राबविण्यात आला असून, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये वह्यांच्या  माध्यमातून हातभार लावण्याचे काम लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले असून, त्यांचे सामाजिक काम चांगले असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटले आहे.            
     यावेळी बोलताना हातकणंगले मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांनी लोकहित मंचच्या उपक्रमांचे कौतुक करत इथून पुढच्या लोकहित मंचच्या अनेक उपक्रमांमध्ये आणि अनाथ बालकाश्रमासाठी आम्हीही हातभार लावू असे आश्वासन देत मनोज भिसे यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
○       यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक,विक्रम वाघमोडे, जयराज बर्गे, रोहित दौंडे, अमित कुंभार, युसुफ पटवेगार, तसेच उद्योगरत्न वि. रा.वेलणकर अनाथ बालकाश्रमातील श्रीमती आरती तळवलकर, श्रीमती निवेदिता ढाकणे मॅडम, सौ स्मिता सपकाळ मॅडम सौ विद्या जोशी मॅडम,गीता पाटसुते मॅडम, नेहा कुलकर्णी मॅडम, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या