आज मा. पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष, वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन तसेच मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकतींची दखल घेत, या धोरणामध्ये अनेक त्रुटी व चुका असल्याचे मान्य केले. तसेच त्या दुरुस्त करण्यासाठी मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खरोखरच ही समिती प्रभावीपणे कार्य करून नागरिकांवरील अन्याय दूर करणार असेल, तर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती त्याचे मनापासून स्वागत करते.
मात्र महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही.
आजही अनेक गंभीर त्रुटी नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत
खुल्या व बांधिव जागाचे दुहेरी मूल्यांकन,वापर भारंक व अद्योगिक, व्यपारी मूल्यांकन,शैक्षणिक संस्था, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सामाजिक संस्था, अनाथाश्रम, समाजमंदिरे, मतिमंद मुलांच्या शाळा यांच्यावरही चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बिल्ट-अप एरिया, कार्पेट एरिया व सदनिकांच्या दरांमध्ये सरसकट पद्धतीने आकारणी करण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात प्रत्यक्षात वापरला जात नसलेल्या रोजगार हमी कराची आकारणी, उपयोगकर्ता कर तसेच विविध विभागांचे आवश्यक उपविधी अस्तित्वात नसतानाही करण्यात आलेली करआकारणी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे मा. पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर संयुक्त बैठक आयोजित करावी. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून कायदेशीर, न्याय्य व सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची नम्र विनंती आहे.
तसेच सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, उद्या सकाळी १०.०० वाजता सांगली महानगरपालिका मुख्यालय, सांगली शहर पोलीस स्टेशन समोर आयोजित गांधीगिरी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांच्या न्याय्य हक्काच्या लढ्याला बळ द्यावे.
– वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती
सतीश साखळकर
हनमंतराव पवार
विष्णू बर्वे
रवींद्र वळवडे
डॉ. ज्ञानचंद्र पाटील
शंभूराज काटकर
आनंद देसाई
बाळासाहेब मासुळे (सर)
नितीन मिरजकर
ओंकार माने