🙏🏻*ना अध्यात्म,ना विज्ञान फक्त भगवान(निसर्ग)*🙏🏻
भगवान - भ -भूमी, ग -गगन, व- वायू/ विचार/वेळ/वेग/विधिलिखित,अ-अग्नि,न - नीर (पाणी).
ना आध्यत्म,ना विज्ञान फक्त भगवान(निसर्ग)हेच खरे सत्य समजून घेवू व यांचे सर्वानी रक्षण करू व त्यांनी दिलेलेल्या प्रसादचे सेवन करून ,गरज नसलेल्या मानव रुपी निर्मिती चा बहिष्कार करू.
कलियुगातील मानव प्राणी स्वतःस प्राणी न मानता या ब्रम्हानंदाचा निर्माता, सर्वे सर्व मानू लागला.कारण स्वतःच्या क्षणभंगुर सुखाच्या स्वार्थासाठी आध्यतम व विज्ञानाला पुढे करून निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला हा निसर्ग/भगवान काळलाच नाही.तो या राक्षस रुपी मानवाचा अंत करेल त्या वेळी त्यांना खरा हा भगवान कळेल.तेव्हा वेळ गेलेली असेल.
प्रत्येक प्राणी जगण्यासाठी धडपडत असताना आपणास दिसतात.पण हा मानव प्राणी मरण्यासाठी का धडपडत आहे.
*अध्यात्म*- अध्यात्म म्हणजे काय तर तत्वज्ञान ज्या वेळी चांगले झाले कि पत्रिका,देव,देवता मुळे झाले. व वाईट झाले कि 10 %अपवाद असतो.100% असे होणारच असे सांगू शकते का हे आपले अध्यात्म. तर मुळीच नाही.फक्त लहान मुलांची समजूत काढण्यासाठी जी आपण त्याला गोष्ट सांगतो तेच मोठ्या माणसाची समजूत काढण्यासाठी सांगितलेली गोष्ट म्हणजे अध्यात्म . हे माझे वयक्तिक मत आहे. आपले मत वेगळे असू शकेल.
विज्ञान - विज्ञानाच्या नावाने नुसती प्रगती दिसते. खरच ही प्रगती म्हणावी का अधोगती. जग चंद्रावर गेल पण माणूस नरकात गेला हे केव्हा कळणार.आधुनिक प्रगतीच्या नावावर मानव,मानव प्राणी न राहता राक्षस झाला.अरे ज्या वेळी या ब्राम्हणडाची निर्मिती झाली त्यावेळी या भगवाने मानवास थोडी बुद्धी जास्त दिली. कारण त्याने या ब्राम्हनंडाची राखण करावी म्हणून. पण याच राक्षशी मानवाने याचे लचके तोडले व स्वतः बरोबर सर्वांचा नाश केला असे दिसते.कलियुगातील या विज्ञान मुळे या जगाचा नाश झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र सत्य.अजून वेळ गेली नाही.
या साठी जो पर्यंत या मानवास खरा भगवान / निसर्ग समजत नाही,तो पर्यंत तो स्वतः व इतरांना सुखी, समाधानी ठेवू शकत नाही.
*मग कोठे, कसा आहे हा भगवान/निसर्ग*
*भगवान*-
भ -भूमी,
ग -गगन,
व- वायू/ विचार/वेळ/वेग विधिलिखित,
अ-अग्नि,
न - नीर (पाणी).
*भ म्हणजे भूमी* - प्रथम या भूमिचे रक्षण करण्यास हवे, कोणत्याही प्राण्याची विष्टा देखील या भूमिस खत,अमृत समान आहे. परंतु या मानवानी स्वतःच्या स्वार्था साठी तयार केलेला प्रत्येक घटक या धरती मातेसाठी विष आहे.आधुनिक शेतीच्या नावाने केल्मिकलचा वापर करून धरती मातेचा घात केला.
स्वछता च्या नावे नुसते फोटो काढून, पैसे खर्च करून दिखावा केला.अरे आपण या धरती मातेस नको असलेले घटकच बनवलेच नाही तर, कशाला हवी स्वछता.धरती मातेने केलेला प्रत्येक कचरा तिच्या साठी उपयोगी आहे. पण मानवानी केलेला हा कचरा सर्वासाठी विष आहे.
आपली ही धरती माता आपल्या मुलाला केव्हाच दुःखी किंवा आजारी पाडत नाही. तिने दिलेल्या आहाराचे कधी आम्ही प्रसाद म्हणून सेवन करत नाही. प्रसाद प्र म्हणजे प्रभू, स म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. ज्या दिवशी हा मानव आधुनिक शेती सोडून स्वतःसाठी नैसर्गिक शेती करेल व फक्त तिने दिलेल्या आहारचे सेवन करेल तेव्हाच तो स्वतः बरोबर इतरांना सुखी, समाधानी ठेवेल......
*ग म्हणजे गगन* - आकाशच भरले आता मोकळा श्वास घेता येत नाही, गुदमरल्यासारखे होऊ लागले आहे. किती प्रगती कारखाने,गाड्या,केमिकल यामुळे संपूर्ण आकाश प्रदूषण करून टाकले फक्त आणि फक्त या मानवानी. स्वतः बरोबर इतर प्राणी देखील जीव गुदमरून सैरावैरा धावत सुटले आहे. अरे आयुर्वेदामध्ये लंघनम परम औषधं सांगितलं मग हे आकाश व आपले शरीर थोडे तरी मोकळी पोकळी सोडण्यासाठी हवी ना. का व कोणासाठी, कशासाठी करत आहोत.आपण हे एकदा स्वस्त विचारून तर पहा.......
*व म्हणजे वायु,विचार,वेळ,वेग विधिलिखित* -
कुत्र्या सारखी अवस्था झाली आपली,कधी शांत बसून विचार करून वेळेत श्वास घेतलाच नाही. कोणत्या प्राणायचे आयुष्य कमी झाले का व, मग मानव इतकी प्रगती करून देखील जीवत पणी मरण यातना सहन करीत आहे.कधी विचार बदलणार, वेळेचे कधी नियोजन करणार, मग वाईट झाले कि आपण त्याला म्हणतो विधिलिखित होते असे होणार,वेळ चांगली म्हणून वाचलो किंवा वेळ वाईट म्हणून गेलो. वेळेला दोष देत बसणार.आपल्या मनातील विचार कधी आपल्या आई वडिलांना सांगितले का? आपल्या बाळाने कितीही मोठा गुन्हा केला तर आई बाप त्यांना त्यातून बाहेर काढतो. मग आपल्या मनातलं खर सत्य का नाही सांगत आपल्या आई बाबांना.मंदिरात कासव का असते कधीच पाहिले नाही का? कासवा सारखे जगताच आले नाही या मानवास.विचाराचा वेग वाढला कि श्वासाचा वेग वाढतो,श्वासाचा वेग वाढला कि वेळेचे गणित बिघडते आणि वेळेचे गणिती बिघडले कि माणूस विधिलिखित म्हणून शरीर सोडून निघून जातो. मग यात कोण चुकले हे कधी कळणार या मानवास.....
*अ म्हणजे अग्नि* - शरीरात अग्नि उत्तेजित नसेल तर खरी भूक लागली हे कसे कळणार.केव्हाव्ही, कधीही,कसेही,कोठेही, कायही हा मानव खाऊ लागला आणि दोष मात्र दुसऱ्याला देऊ लागला. मुडदुस झाला या मानवाला. लहान पणी बाळाला मूडदुस झाला कि आई बाळाला कवळ्या उन्हात ठेवत असत. आता प्रत्येकास महा मूडदुस झाला. केव्हा कळणार आपणास. रात्र भर मोबाईल मध्ये डोळे फोडून सकाळी केव्हा उठतो आपण.केव्हा कळणार आपणास.अरे पूर्वी एकटे कोणीच खेळ खेळत नसत. आता हे मोबाईल विष जवळ घेऊन न खेळलेले खेळ एकटेच खेळू लागला. या मोबाईल च्या प्रगती मुळे सगळ्या मानवजातीचा नाश होईल तेव्हा कळून काय करणार.केव्हा जागे होणार......
*न म्हणजे नीर (पाणी )-*
या ब्राम्हण्ड मध्ये 75% पाणी व 25 % इतर घटक आहेत. त्याच प्रमाणे या प्रत्येक मानवत आहे.आहे का आपल्या शरीरात एवढे पाणी. काय करत आहे आपण.केव्हा पाणी घेतो आपण, जेवताना कोणता तरी प्राणी पाणी पितो का रे, मग आपण का पितो. केव्हा कळणार केव्हा,कधी,कसे,किती पाणी पियावे.
नाहीच कळणार या आधुनिक मानवाला.....
इतर प्राणी जगण्यासाठी धावपळ करत आहे. पण हा मानव मरणासाठी धावपळ करत असताना दिसत आहे.
अरे मी का सांगत आहे तुम्हाला .स्वतःच्या बाळांनी आयकले नाही.तर तुम्हास मी कोण सांगणार. जगा तुम्हास हवे तसे जगा, स्वतःबरोबर या निष्पाप श्रुष्टी चा पण नाश करून टाका.तुमचा हा चांगला, वाईट इतिहास पुढच्या पिढीला कळणारच नाही.कारण तो इतिहास पाहण्यासाठी असायला तर हवा ना.आपली मूल निरोगी, सुखी,समाधानी हवीत ना....
🙏🏻जय भगवान 🙏🏻
मोहनजी-9423862244