येळेगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/06/2026 6:16 PM

नांदेड :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र, येळेगाव येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांच्या हस्ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेची सुरुवात झाली.

कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, सरपंच प्रशासक सरस्वती गंगातीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. युवराज बनसोडे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुर्यवंशी यांनी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये असे आवाहन केले. विशेषतः साखर कारखाना वसाहत, विटभट्टी आणि चुनाभट्टी परिसरातील ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सर्व आयुष्मान आरोग्य मंदिर व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बूथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृहभेटीद्वारे (Home Visits) लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने पालकांना आपल्या ० ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या