सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्वादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/06/2026 7:19 PM

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी शर्ती सह योजना म्हणजे कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे तसेच राज्यभरातील लाखो शेतकरी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट आहे परिणामी संबंधित शासन निर्णय बदलण्याची आवश्यकता आहे तसेच या योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करावी  अशा आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कनीचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले..
तसेच २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतल्या शेतकऱ्यासाठी केवळ ५०,००० पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादीची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी... एक वेळेस समझोता योजनेत लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न घालता सरकारने सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करावी...तसेच २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यावरील पन्नास हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी लागू करावी... प्रोत्साहनपूर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याचे रद्द करावे..२०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्र अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा... पिक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक अटी रद्द करून एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करावी... पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करावी...
वरील मागण्यांचे निवेदन दिले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील , कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिलाध्यक्ष सुस्मिता जाधव ,अमोल शिंदे ,हायुम सावनूरकर ,सचिन जगदाळे ,महेश कुपाडे ,वास्कर शिंदे ,दिनकर पाटील ,प्रदीप सावंत ,आयुब बारगीर, शुभम जाधव ,महालिंग हेगडे ,शितल खाडे ,सुभाष तोडकर गीतांजली इरकर श्रीशैल्य ढोले ,दत्ता पाटील ,  तेजश्री अवघडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या