भागवत कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातली व्यथा दूर होते हभप भगूररत्न गणेश महाराज करंजकर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 11/06/2026 2:17 PM

भागवत कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातली व्यथा दूर होते हभप भगूररत्न गणेश महाराज करंजकर प्रतिपादन


भगूर वार्ताहर:- भागवत कथा श्रवण केल्याने निर्भयता प्राप्त होते.भागवत कथा ऐकल्याने मानवाचा उत्कर्ष होतो भागवत कथा ऐकल्याने तरुण युवकांवर चांगले संस्कार होतात मुलांकडून आई-वडिलांची सेवा घडते आई-वडिलांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठे पुण्य आहे हे या भागवत कथेत सांगितले जाते म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात एकदा तरी भागवत कथा ऐकावी ही कथा ऐकल्याने जीवनातील व्यथा नक्कीच दूर होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार कथाकार भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर यांनी भगूर येथे केले.भगूर येथील सुप्रसिद्ध तुळसा लॉन्स येथे मंगळवार दि. ९ ते १५ जून पर्यंत भव्य भागवत गीता कथासार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी करंजकर महाराज बोलत होते. प्रारंभी सकाळी करंजकर गल्ली येथून भव्य ग्रंथदिंडी व हभप गणेश महाराज करंजकर यांची बगीतून शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी शहरातील प्रमुख महामार्गावरून ही ग्रंथ दिंडीचे प्रस्थान करण्यात आले या दिंडीची सांगता तुळसा लॉन्स येथे करण्यात आली. 
यावेळी भाग्योदय भजनी मंडळ  ग्रामस्थ व विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुढे बोलताना गणेश महाराज करंजकर यांनी सांगितले की आजच्या युगात प्रत्येकाच्या जीवनात धार्मिकता किती महत्त्वाचे आहे भगवंत व संतांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनात किती अनमोल आहे भगवंतांच्या या शिकवणीचा प्रत्येकाने आपल्या जीवनात व कार्यात आचरण केले पाहिजे प्रामाणिकता,सकारात्मक विचार व समाधानी मन हेच जीवनाचे सत्कर्म आहे यावरही करंजकर महाराजांनी समाज प्रबोधन केले.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिवसेना उपनेते विजय करंजकर,माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर,सोसायटी संचालक रंगनाथ करंजकर,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर,तुळसा लॉन्सचे संचालक संजय करंजकर,गटनेते शंकर करंजकर,नितीन करंजकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सप्ताहभर चालणाऱ्या या कथेत दैनंदिन कार्यक्रमात सायंकाळी ६ ते ९ भागवत कथासार तदनंतर महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम असून भागवत कथासार कथेचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवछत्रपती तालीम संघ करंजकर गल्ली, वेताळबाबा मित्र मंडळ, भाग्योदय भजनी मंडळ मुरलीधर मंदिर व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे. भागवत कथेप्रसंगी महाप्रसादासाठी विजय करंजकर,शरद पवार,संजय करंजकर,अमोल शिरसाट, मनोहर शेळके,राजेंद्र मुंदडा,सुनील करंजकर,भावसार,वेताळ बाबा मित्र मंडळ आदींचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या