*भगूर येथे नमो विक्रमपूर्ती निमित्ताने महाआरती संपन्न*
भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पं.जवाहरलाल नेहरू यांच्या 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढून, लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून 4399 दिवसांचा सर्वांत जास्त कार्यकाळ पुर्णकेल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथे श्री माहेश्वरी बालाजी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली.
या प्रसंगी भाजप नाशिक जिल्हा सरचिटणीस शरदजी कासार यांनी मोदींच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. या वेळी उपजिल्हाध्यक्ष तानाजी भोर, कॅन्टोन्मेंट देवळालीचे माजी उपाध्यक्ष भगवानदासजी कटारिया,भाजप देवळाली-भगूर मंडल अध्यक्ष व भगूर नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रसादजी आडके,सरचिटणीस संदीपजी शेटे,प्रकाशजी कर्डीले,उपाध्यक्ष निलेश हासे,नगरसेवक अमोलजी इंदारखे,बबलू जाधव,डॉ.मृत्युंजयजी कापसे,दीपकजी बलकवडे तसेच नगरसेविका सुजाताताई शिरसाट ,विद्याताई बलकवडे,भाजप नेते विशालजी शिरसाट,भाजप मंडल एससी सेल अध्यक्ष विवेकजी मंडाले,सपना आडके,सौ.इंदारखे, निलेश हेंबाडे,आण्णा कुंडारिया,भूपेश जोशी,विहान शेटे यांचेसह भगूरकर नागरिक उपस्थित होते.