जेष्ठ नागरिक बंधूंनी वर्षात एकदा आरोग्य तपासणी करावी. डॉक्टर मंजुषा दराडे. ज्या प्रमाणे आपण वाढदिवसानिमित दरवर्षी केक कापून वाढदिवस साजरा करतो, त्या प्रमाणे आपल्या आरोग्याची तपासणी वर्षातून एकदा नक्की करावी म्हणजे काही आजार निघाला तर त्यावर इलाज करता येतो असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेल च्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर मंजुषा दराडे यांनी केले. भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार, सभासद वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात आयोजन केले त्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव नाना गायकवाड होते. अतिथी परिचय व स्वागत प्रास्ताविक प्रशांत कापसे यांनी केले . या कार्यक्रमात वैशाली मुकणे यांची सहायक पोलिस निरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला जून महिन्यातील ६० सदस्यांचा वाढदिवसानिमित्त मायेची शाल देऊन सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन प्रवीण नारायणराव आडके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप चव्हाण, किरण बेदरकर, मारुती कोरडे, अंबादास पाटील त्र्यंबक करंजकर बबनराव आडके , आदींनी परिश्रम घेतले वसंतराव खैरनार यांनी आभार मानले अंबादास मुठाळ, रतन लोट,