कुपवाड मधील विविध स्मशान भूमींची आयुक्त संचित मोहपात्रा व उपमहापौर गजानन मगदुम यांची संयुक्त पाहणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/06/2026 7:41 PM

सांगली, दि.10,
  कुपवाड शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी तसेच भविष्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संचिता मोहपात्रा आणि उपमहापौर गजानन मगदूम यांनी अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली.
यावेळी स्वामी मळा, बुधगाव रोड परिसरासह विविध स्मशानभूमींना भेट देऊन अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, आवश्यक मूलभूत सुविधा तसेच महापूर कालावधीत निर्माण होणाऱ्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
स्मशानभूमींमध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा, संरक्षण भिंती, स्वच्छता आणि पावसाळ्यातील पाणी निचरा यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी विविध विकासकामांचे नियोजन करून स्मशानभूमी परिसर अधिक सुस्थितीत व सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आयुक्त संचिता मोहपात्रा व उपमहापौर गजानन मगदूम यांनी सांगितले.
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे संबंधित विभाग प्रमुख, अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या