सांगली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खणभाग, शांतीनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. यामुळे लाखो लीटर शुद्ध पाणी थेट रस्त्यावर वाहून वाया जात आहे. शहरात अगोदरच दोन दिवस पाणी येणार नसल्याचे घोषित करण्यात आले असताना, त्यातच हा प्रकार घडल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, ही गळती त्वरित थांबवून प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी लोकहित मंचकडून केली जात आहे.
- मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली