राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 मध्ये इयत्ता तिसरी ते बारावीमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/06/2026 8:02 PM

नांदेड :- आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मा. पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. 

योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती अंगीकारणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारतीय संस्कृती वारसाचा अविभाज्य घटक आहे.

आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, योग विदया धाम, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना,नांदेड, योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  21 जून, 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच NCERT आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2016 पासून राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यासंदर्भात 10 जून, 2026 पर्यंत इयत्ता तीसरी ते इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून सहभाग घेता येणार आहे. 

नांदेड जिल्हयातून अधिकाधिक सहभाग होण्यासाठी प्राचार्य, डायट, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) गटशिक्षणाधिकारी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विविध योग संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक व नागरीक यांनी सदर मेसेज आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील व केंद्रातील ग्रुपवर पाठवून विद्यार्थ्यांना पुढील लिंकवर नोंदणी करून सहभाग होण्यासाठी आवाहन करावे असे कळविले आहे.
🧘‍♀️ NCERT National  Yoga Olympiad 2026 Online Quiz
🎓 Participation: Students of Classes 3rd to 12th
✅ Free Registration
✅ Online Participation
🔗 Registration 
here: https://www.nyoncert.in/registration2026/register.php
🌐 For full details kindly visit: www.nyoncert.in
📢 Kindly registered and share
असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या