कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाची खेळाडू अंजली वाघे हिने राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
सोलापूर नेहरूनगर येथे पार पडलेल्या 52 व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघातून अंजली वाघे हिची निवड झाली होती. या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत जिल्हा खो-खो संघाकडून खेळताना अंजली वाघे हिने सर्वोत्तम कामगिरी करत जिल्हा संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
अंजली हिने या पूर्वी कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सांगली जिल्हा संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवले होते.
अंजली हिला राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील,अजित पाटील,रमेश पाटील,प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळाले.