भगूरची पावन भूमी हिंदुस्तानचे तिर्थस्थळ: नितीन गडकरी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 06/06/2026 12:50 PM

भगूरची पावन भूमी हिंदुस्तानचे तिर्थस्थळ: नितीन गडकरी

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूर या जन्मभूमीचा गौरव सुवर्ण अक्षरात आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदया वर कोरला गेला असून, स्वातंत्रवीर सावरकर यांची पावन जन्मभूमी भगूर  हिंदुस्तानचे एक पवित्र तिर्थस्थळ आहे.असे गौरव उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले.  नागपूर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिभवन येथे भगूरचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके यांनी भगूरचे  भाजपा नगरसेवक, नगरसेविका आणि  कार्यकर्ते यांचा संघ मुख्यालय येथे  दर्शन सोहळा आयोजित केला होता त्या प्रसंगी केंद्रीय मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी   नागपूर संघ स्वयंसेवक डॉ उमेश शिंगणे यांच्या माध्यमातून सदिच्छा भेट घेतली त्या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना मा मंत्री मोहोदयांनी वरील गौरव उद्गार व्यक्त केले. 

स्वातंत्रवीर सावरकर म्हणजे नुसते हिंदुस्थानचे प्रेरणास्रोत नव्हते तर चिरकाल तेजोमय राहणारी एक  धगधगती ज्वाला म्हणून आजही पुजली जाते ती तेजोमय हिंदुत्वाची ज्वाला आपण सर्वांनी अखंड पणे तेवत ठेवणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खरी आदरांजली ठरेल असे भावनिक आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संकल्पित केलेले अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण होई पर्यंत कार्यकर्त्यांनी अविरत स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमीची सेवा करावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. 

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विचाराधीन असून आपण निवेदित केलेल्या रास्त मागण्याचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन मा केंद्रीय मंत्री महोदयांनी उपस्थितांना दिले. 

सदर सदिच्छा भेटी प्रसंगी भगूरच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा ताई बलकवडे तसेच उपनगराध्यक्ष प्रसाद आडके यांच्या वतीने भगूरच्या विकासा करता अपेक्षित सर्व नगरसेवकांच्या वतीने  मागण्यांचे निवेदन मा केंद्रीय मंत्री महोदयांना दिले गेले. 

या प्रसंगी भगूरचे उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेविका सौ सुजाता शिरसाट, नगरसेविका सौ विद्या बलकवडे, नगरसेवक प्रा. डॉ.मृत्युंजय कापसे, नगरसेवक दीपक बलकवडे,नगरसेवक बबलू जाधव, नगरसेवक अमोल इंदारखे संघ स्वयंसेवक विशाल शिरसाट,रोहित चव्हाणके,स्वातंत्रवीर सावरकर जन्मोत्सवाचे कार्याध्यक्ष, भाजपा मंडल सरचिटणीस संदीप शेटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या