बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/05/2026 7:02 PM

नांदेड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शनिवार 2 मे 2026 रोजी ऑनलाईन  जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळामार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. 

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्र तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले आहे. लातूर विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित प्राचार्य, विद्यार्थी, पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या