जिल्हा अजिंक्यपद खो- खो स्पर्धेत राणाप्रताप कुमार संघास उपविजेतेपद : मुलींच्या संघाला चतुर्थ क्रमांक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/05/2026 12:23 PM

विटा येथे झालेल्या कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाच्या कुमार संघाने उपविजेतेपद मिळवले तर राणाप्रताप मुंलीच्या संघास चतुर्थ क्रमांक मिळाले . स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक म्हणून राणाप्रताप मंडळाच्या कु सार्थक हिरेकुर्ब यांची निवड झाली.
     विटा येथे झालेल्या कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुपवाड चा राणाप्रताप मंडळाच्या किशोर संघाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत उपविजेतेपद पटकावले. तर राणाप्रताप मुंलीच्या संघाने विविध संघावर मात करत चतुर्थ क्रमांक मिळवले. या स्पर्धेतील किशोर गटातील उत्कृष्ट संरक्षक म्हणुन राणाप्रताप मंडळाचा खेळाडू कु.सार्थक हिरेकुर्ब यांस गौरवण्यात आले.या कुमार संघात संघात राणाप्रताप मंडळाच्या सार्थक हिरेकुर्ब, रितेश बिराजदार, तेजस कोष्टी,निल पाडळे,सोहम पाडळे,वैभव फोंडे,अविनाश आगलावे,ओंकार बंडगर,अंतरिष जमदाडे,प्रज्वल हडपत,यश शिंदे,समर्थ पाटील,अथर्व खांडेकर,प्रणव कर्नाळे या खेळाडूंचा समावेश होता.
स्पर्धेचे बक्षीस वितरण विविध मान्यवराच्या व जिल्हा खो-खो संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडले.
     खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील,रमेश पाटील,  प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,शिवसागर पाटील, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभय सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आदिंचे मार्गदर्शन मिळाले.

Share

Other News

ताज्या बातम्या