अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे स्मशानभूमीची स्वच्छता;गावकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/05/2026 5:16 PM

नांदेड :- तालुक्यातील लोणी खुर्द येथे सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचा संदेश देत
माजी सरपंच प्रकाश दत्तराव लोणे यांच्या पुढाकाराने
स्थानिक स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाढलेले गाजरगवत, काटेरी झुडपे आणि साचलेला कचरा साफ करून या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.लोणी खुर्द येथील स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली होती. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने परिसरात झाडे-झुडपे वाढली होती, ज्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. हीच समस्या लक्षात घेऊन
माजी सरपंच प्रकाश दत्तराव लोणे यांच्या पुढाकाराने
 गावातील तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत 'स्वच्छता मोहिमेचे' आयोजन केले.​गावातील अबालवृद्धांनी हातात झाडू, फावडे आणि विळे घेऊन स्मशानभूमीत हजेरी लावली.संपूर्ण परिसरातील प्लास्टिक, सुका कचरा आणि टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.रस्त्यामध्ये अडथळा ठरणारी काटेरी झुडपे आणि गाजरगवत उपटून टाकण्यात आले.
​"स्मशानभूमी हे गावाचे एक संवेदनशील स्थान आहे. या जागेचे पावित्र्य राखणे आणि ती स्वच्छ ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या भरोशावर न राहता गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान खरोखरच कौतुकास्पद आहे," अशी भावना गावातील
नागरिकाने व्यक्त केली.
​या स्वच्छता मोहिमेमध्ये गावातील तरुण मंडळीनी  उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. लोणी खुर्द गावकऱ्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत असून, इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे. यावेळी स्वच्छता करण्यासाठी बालाजी सटवाजी लोणे, मारोतराव जनार्दन लोणे,आकाश प्रथ्विराज लोणे, सुरज लोणे,बापुराव किसन लोणे,अजय लोणे,रंगेश केरबाजी लोणे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या