नांदेड :- शहरातील तेहरानगर येथील महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय तसेच जिजामाता माध्यमिक विद्यालय यांच्या सन 2026 च्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दोन्ही विद्यालयांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.निकाला निमित्त दोन्ही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संयुक्त सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाने यावर्षी 57 टक्के निकालाची नोंद केली.परीक्षेला बसलेल्या एकूण 37 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील विद्यार्थिनी *कु.ऐश्वर्या उत्तम जोंधळे हिने 75.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु.अंजली दिलीप हातीअंबिरे हिने 73.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला,तर कु.वैष्णवी विजय काटके हिने 68.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला......तर *जिजामाता माध्यमिक विद्यालयाने यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली*. विद्यालयातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून...*सूर्यप्रकाश बळवंत गोडबोले याने 84.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.कु.सबा अंजुम शेख नजीर हिने 69.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला,तर कुमारी अर्फिन शेख तोफिक हिने 64.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला*.....दोन्ही विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.मारोती हांडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती स्वाती मुनेश्वर तसेच सुजाता कांबळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रवि मुखडे यांनी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पहार,पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.मारोती हांडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना सातत्यपूर्ण परिश्रम,शिस्त व आत्मविश्वास यांच्या बळावर अधिक मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले.तसेच दोन्ही विद्यालयांच्या शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. नरसिंग पडलवार यांनी केले.या संयुक्त सत्कार सोहळ्यास शिक्षकवृंद,पालक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन्ही विद्यालयांच्या यशामुळे तेहरानगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.