बेंगलोर मुंबई विशेष ट्रेनचे सांगली रेल्वे स्टेशनवर आज उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
महावितरणच्या संचालिका नीताताई केळकर व प्रवीण दिवाणजी विशाल पवार रमेश आरवाडे तसेच रेल्वे प्रवासी ग्रुपचे इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
आठवड्यातून दोन दिवस सदर गाडी धावणार आहे मुंबईला वं बेंगलोरला जाणाऱ्या प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना विनंती आहे डबल ट्रॅक झालेला आहे इलेक्ट्रिक केशन पूर्ण झालेला आहे सध्या पेट्रोल व डिझेलचे टंचाई असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वापरावी असे आवाहन करण्यात येते . मात्र त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात अजून नवीन गाड्या सुरू करून प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून अजून ठोस प्रमाणात पावले उचलावीत काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा शिर्डीला जाताना वंदे भारत चा वापर केला जाण्या येण्यासाठी अशा मुबलक गाड्या उपलब्ध असतील तर लोक 100% सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील त्यामुळे अजून सविस्तरित्या गाड्या चालू करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा अशी विनंती आहे .
सतिश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.