साधेपणातून जपलेली सामाजिक बांधिलकी - २७ मे रोजी गुंठेवारी भवनात मा. चंदनदादा चव्हाण यांचा वाढदिवस

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/05/2026 6:34 PM

*गुंठेवारी चळवळीचे जनक मा. चंदनदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा* 

*साधेपणातून जपलेली सामाजिक बांधिलकी - 27 मे रोजी गुंठेवारी भवनात वाढदिवस*

सांगली - गुंठेवारी क्षेत्रातील लाखो लोकांना हक्क मिळवून देणारे, अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे आणि जयहिंद सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष *मा. चंदनदादा चव्हाण* यांचा वाढदिवस येत्या *27 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता* कुपवाड येथील *गुंठेवारी भवन, एस. टी. कॉलनी, 100 फुटी रोड, रामकृष्ण नगर* येथे अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोणताही डामडौल न करता, केवळ सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय चंदनदादांनी घेतला आहे. हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.

*गुंठेवारी चळवळ - एका लढ्याची 30 वर्षे*

1994 साली 'गुंठेवारी' हा शब्द महसूल खात्याच्या दप्तरीही नव्हता. शहरालगतच्या शेतजमिनीचे छोटे तुकडे करून झालेली घरे 'अनधिकृत' ठरवली जात होती. ना सातबारा नोंद, ना लाईट-पाणी-रस्ता. अशा लाखो कुटुंबांच्या व्यथा घेऊन चंदनदादा चव्हाण यांनी गुंठेवारी चळवळीचा झेंडा हाती घेतला.

सुरुवातीला माजी खासदार *कै. प्रकाश बापू पाटील* यांनी चळवळीचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी चंदनदादांनी खांद्यावर घेतली. सांगली जिल्ह्यात *'हंटर फोड आंदोलन', 'बोंबाबोंब आंदोलन'* यांसारखी आक्रमक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. 

युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री *कै. मनोहर जोशी* यांच्यासमोर त्यांनी गुंठेवारीचा प्रश्न ताकदीने मांडला. "लोकांची घरे नोंद होत नाहीत, लाईट-पाणी-रस्ते मिळत नाहीत, शहरी व ग्रामीण भागातील घरे सातबारा किंवा नगरपालिका सदरी नोंद करून शासनाच्या सुविधा द्याव्यात" ही मागणी लावून धरली.

अखेर *2001 साली* चंदनदादांच्या लढ्याला यश आले. महसूल खात्यात प्रथमच 'गुंठेवारी' हा शब्द अधिकृतपणे समाविष्ट झाला आणि गुंठेवारीबाबत नवीन कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

*वारसा स्वातंत्र्यलढ्याचा, वसा जनसेवेचा*

चंदनदादांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील *नागज* हे मिरज-पंढरपूर हायवेवर वसलेले. त्यांचे वडील *कै. केदारी चव्हाण* हे 1942-47 या काळात *आझाद हिंद फौजेतील स्वातंत्र्यसैनिक* होते. स्वातंत्र्यलढ्याचा तोच वारसा घेऊन चंदनदादांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा वसा घेतला.

त्यांना माजी खासदार कै. प्रकाश बापू पाटील, माजी आमदार कै. मदनभाऊ पाटील, कै. शिवाजीराव शेंडगे बापू यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. आजही महाराष्ट्रातील नेतेमंडळी, वरिष्ठ अधिकारी गुंठेवारी व महसूल विषयातील अनुभवी व हुशार व्यक्तिमत्व म्हणून चंदनदादांचे मार्गदर्शन घेतात.

*जयहिंद सेना - राजकीय पटलावर नवी ओळख*

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई पुरेशी नाही, हे ओळखून चंदनदादांनी *'जयहिंद सेना पक्ष'* स्थापन केला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भिवंडी व डोंबिवली येथे पक्षाचे 12 नगरसेवक उमेदवार रिंगणात होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि पक्ष एकदम राजकीय पटलावर आला.

आज महाराष्ट्रातील *24 जिल्ह्यांमध्ये* जयहिंद गुंठेवारी चळवळीचे पदाधिकारी जयहिंद सेना पक्षाशी जोडले गेले आहेत. *'जयहिंद गुंठेवारी सेना'* व *'जयहिंद युवा सेना'* या पक्षाच्या अंगीकृत संघटना जोमाने काम करत आहेत.

*महाराष्ट्रातील पहिले 'गुंठेवारी भवन'*

शेतकरी, ग्रामस्थ व गुंठेवारी क्षेत्रातील लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी चंदनदादांनी सांगली येथे *महाराष्ट्रातील पहिले 'गुंठेवारी भवन'* स्थापन केले आहे. येथे रोज शेकडो लोक आपल्या समस्या घेऊन येतात आणि त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते.

*सन्मान आणि पुरस्कार*

तमाम जनतेच्या आशिर्वादाने चंदनदादांना *'सांगली भूषण'* व *'क्रांतिवीर'* यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शेतकरी, तरुण, बेरोजगार व गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे, न्याय-हक्कासाठी अग्रेसर राहणारे लढवय्ये नेतृत्व म्हणजे मा. चंदनदादा चव्हाण. 

*गुंठेवारी चळवळीचे जनक, जयहिंद सेना पक्षप्रमुख मा. चंदनदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!*

*शुभेच्छुक:*  
*मा. रामदास उर्फ दादा सावंत*  
प्रदेशाध्यक्ष, जयहिंद गुंठेवारी सेना, महाराष्ट्र राज्य  
व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते 
मा. विजय बल्लारी
जिल्हा प्रमुख, जयहिंद गुंठेवारी सेना सांगली 

प्रसिद्धी, लेख.... 
मा. रामदास सावंत.

Share

Other News

ताज्या बातम्या