### **पावसाळा व संभाव्य पूरनियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका यंत्रणा सज्ज; आयुक्त संजीता महापात्र यांनी दिली सविस्तर माहिती**
आगामी मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी **मा. श्री. मैनाक घोष** आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी **मा. श्री. विशाल नरवाडे** यांनी आज महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला (मंगलधाम, सांगली) भेट देऊन पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. आपत्ती काळात नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी अत्यंत समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त **श्रीम. संजीता महापात्र** यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मान्सून पूर्व नियोजनाची आणि तांत्रिक सज्जतेची सविस्तर माहिती दिली.
**पाहणी दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे व सज्जता:**
* **२४x७ वॉर रूम (War Room) कार्यान्वित:** आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील अत्याधुनिक नियंत्रण कक्ष आणि वॉर रूमची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. महापालिका क्षेत्रात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, सर्व विभागांशी तो वायरलेस आणि वॉक-टॉकीद्वारे जोडण्यात आला आहे.
* **पाणी पातळी सनियंत्रण यंत्रणा:** कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेली सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा आणि 'वे‘र मॉनिटरिंग स्टेशन'च्’ा कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला.
* **आपत्ती मित्र ॲप व प्रतिसाद दल:** महापालिकेने तयार केलेले 'आप‘्ती मित्र’ ॲप आणि प्रभागनिहाय तैनात करण्यात आलेली तातडीच्या उपाययोजनांची पथके (Response Teams) कशा प्रकारे काम करणार, याचे सादरीकरण करण्यात आले.
* **बचाव साहित्य व निवारा केंद्रे:** शोध व बचाव कार्यासाठी लागणारे बोट, कटर, इमर्जन्सी लाईट्स या साहित्याची तपासणी करण्यात आली. तसेच संभाव्य पूरबाधित सखल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमधील सुविधांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद रजपूत तांत्रिक अधिकारी बांदेनावाझ पिरजादे व कर्मचारी उपस्थित होते.