अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर जामखेड पोलिसांची धडक कारवाई ६ जणांवर गुन्हे दाखल; ४९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 24/05/2026 9:36 PM


जामखेड : जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन (अहिल्यानगर), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे (अहिल्यानगर) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रवीणचंद्र लोखंडे (कर्जत विभाग) यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. कारवाईसाठी दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती.
या पथकांमध्ये पोसई संपत कन्हेरे, सफौ कदम, पोहेकॉ/१०३ एस. डी. लोखंडे, पोना/२०८७ रवींद्र वाघ, पोकॉ/२४२७ देवीदास पळसे, पोकॉ/७५४ कुलदीप घोळवे, पोकॉ/१०१३ आकाश शेवाळे, पोकॉ ईश्वर परदेशी, पोकॉ गणेश ढोबळे व पोकॉ सचिन देवडे यांचा समावेश होता.
पोलिसांनी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ६ ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या ६ जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण ४९ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या