नांदेड :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- डीबी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) सुध्दा सादर करावा. विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 2 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.