नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियोजीत एक दिवशीय अनुज्ञप्तीविषयक कामकाजाचे शिबिर कंधार येथे 3 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले होते. परंतु शुक्रवार 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अनुज्ञप्तीविषयक शिबिर गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिक, अनुज्ञप्तीधारक अर्जदार यांनी यांची नोंद घ्यावी व कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.
तरी कंधार येथील एक दिवशीय अनुज्ञप्ती विषयक कामकाजाचे शिबिर 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांनी/अनुज्ञप्तीधारकांनी आपली सर्व कामे शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून करुन घ्यावीत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.