दहावी-बारावी विद्यार्थ्यांना एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्र; दुरुस्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/04/2026 5:07 PM

नांदेड :- फेब्रुवारी-मार्च 2026 पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता एकत्रित स्वरूपात देण्यात येणार आहेत.

या एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे पहिले नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने करून घेणे आवश्यक आहे. जर अशी दुरुस्ती अद्याप केलेली नसेल, तर ती मंडळामार्फत तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, फेब्रुवारी/मार्च 2026 च्या प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त करण्यात आले आहेत, त्यांची माहिती अचूकपणे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर छापण्यासाठी संबंधित फोटो पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे.

यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर “फोटो करेक्शन” ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या लिंकद्वारे फोटो दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी.

निर्धारित कालावधीनंतर कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या